– स्थानिक प्रशासनाकरवी जिल्हाधिकारी यांना निवेदन
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
यंदाच्या अवाजवी पावसाने शेतकरी पुरता आर्थिक दृष्ट्या लयास आल्याने त्यांना मायबाप सरकारने समाधानकारक मदत करावी या प्रमुख मागणीसाठी मारेगाव तालुका काँग्रेसने प्रशासनास साकडे घातले आहे.
कृषिप्रधान देशाचा पोशिंदा यंदाच्या पावसाने पूर्णतः मेटाकुटीस आला आहे. सोयाबीन सारखे पीक पूर्णपणे उध्वस्त होवून कपाशीतही कमालीची घट निर्माण होवून आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे वर्षभराचे नियोजन कोलमडले असतांना यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या या मागणीसाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी चे वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरीशंकर खुराणा, संचालक वसंतराव आसूटकर, रविंद्र धानोरकर,अंकुश माफूर यांचेसह पदाधिकारी सह कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.