
– बुरांडा (ख ) हायवेवरील घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
यवतमाळ कडे जाणाऱ्या राज्यमहामार्गांवर असलेल्या पुलाच्या कठड्याला दोर बांधून बुरांडा येथील इसमाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी 8.30 सुमारास उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मारोती देवराव कामटकर (45) रा. बुरांडा (ख )असे मिस्त्री काम करणाऱ्या मजुराचे नाव आहे.
मारोती हा मिस्त्री काम करून खळगी भरायचा. गत 12 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला होता.यात त्याला अटकही झाली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना परत न्यायालयाचा समन्स धडकला. न्यायालयाच्या धसक्याने तो चार दिवसापासून विचलित होता. आज सकाळी गावातील पारावर काहीलोंकाशी हितगुज करीत हायवे वर असलेल्या पुलावर जावून गळफास घेत जीवनाचा अखेर केल्याची घटना उघडकीस आली.
मृतक मारोती यांच्या मागे एक मुलगी आहे. मुलगी ही मामाकडे राहत असतांना मारोती हा मोलमजुरी करून एकटाच जीवन कंठीत असतांना त्रागलेल्या जीवनाचा शेवट केला. ह्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.