खळबळजनक…अंत्यविधी भोवला,चौघे कायद्याच्या चाकोरीत अडकले

 

ग्रामसेवकाची फिर्याद 

मारेगाव – विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील बोरी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात अंत्यविधी करणाऱ्या चौघा विरोधात मारेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

प्राप्त माहिती नुसार, मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द येथे स्मशानभूमी नसल्याने संतप्त नातेवाईक व आप्तेष्टीनी मृतक रामदास पुरुषोत्तम मानकर (81) यांचा अंत्यविधी थेट ग्रामपंचायत कार्यालय समोरच दि. 28 जुलै रोजी केला.या घटनेने सर्वच अवाक होत प्रशासनात खळबळ माजली.

 

दरम्यान,कायद्याच्या चाकोरीबाहेरील घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले. ही घटना गांभीर्याने घेत ग्रामसचिव यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली. त्यानुसार बोरी खुर्द येथील चौघावर कलम 125 / 287 / 3/5 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम 3 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

स्थानिक पातळीवर स्मशानभूमीचा अभाव. संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात केलेला अंत्यसंस्कार आणि मृतकाच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment