Breaking News

अपघात..दुचाकीवरून नियंत्रण सुटून इसमाचा मृत्यू

 

– सालेभट्टी येथील प्रशांत नांदेच्या मृत्यूने शोककळा

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

तालुक्यातील सालेभट्टी येथील प्रशांत शंकर नांदे (46) हे दुचाकीने गावाकडे जात असतांना दुचाकीवरून रोडच्या कडेला पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारला रात्री उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

प्रशांत हा स्वतःची क्रूझर वाहन चालवित व शेती करीत कुटुंबाचा गाडा हाकायचा. तो काल मारेगाव येथे खासगी कामासाठी पल्सर दुचाकीने आला होता. रात्री 9 वाजता गावाकडे परतत असतांना मांगरूळ सालेभट्टी वळण रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून रोडच्या कडेला पडला. बराचवेळ निपचित पडून असतांना अतिरक्तस्त्राव आणि मानेला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

दरम्यान, प्रशांत कुटुंबातील कर्ता व एकुलता एक मुलगा होता. आई, वडील, पत्नी व दोन मुले आणि एक बहीण असं कुटुंब असलेल्या प्रशांतच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सालेभट्टी व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment