– मार्डी येथील घटनेने हळहळ
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
फिस्की जंगलाला लागून असलेल्या शेतात जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून ठेक्याने शेती करणाऱ्या शेतमजुराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मार्डी शिवारात आज सकाळी उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
शामसुंदर उद्धव कुमरे (33) रा. मार्डी असे मृतकाचे नाव आहे.
शामसुंदर हा मार्डी शिवारात असलेल्या एका शेतकऱ्याची शेती भाड्याने करायचा. शेती उत्पादनाची लगबग सुरु असल्याने तो काल शनिवारला सकाळी शेतात गेला मात्र संध्याकाळी घरी परतलाच नाही.
सकाळी नातेवाईकांनी शेतात शोध घेतला असता फिस्की जंगल लगत असलेल्या शेतात जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून शामसुंदर यांचा मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे.
परिणामी, मृतकाच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली आहे.