Breaking News

वेदनादायी… अडीच वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

 

खंडणी येथील घटनेने हळहळ 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

आजीसोबत गिरणीवर गेलेल्या नातीला सर्पदंश झाल्याने तिचा करुण अंत झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील खंडणी येथे दि. 11 आँक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

स्नेहा दशरथ मडावी असे मृत बालिकेचे नाव आहे.

 

खंडणी येथे दिवसभर आजीसोबत बाळगणाऱ्या नातीने आजी सोबत गिरणीवर जाण्याचा हट्ट धरला. आजी दळण दळत असतांना चिमुकली आजूबाजूला खेळत होती. अशातच तीला सापाने चावा घेतला. काही वेळातच मारेगाव रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

या दुर्देवी घटनेने खंडणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment