Breaking News

नगरपंचायतचा बेदखलपणा.. घनकचरा गाडीवर कामगारांचा वाणवा

 

– वृद्धासह गरोदर मातांना टाकावा लागतोय कचरा 

– तात्पुरता कंत्राट नागरिकांच्या जीवावर 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

घनकचरा व्यवस्थापन घरगुती होणाऱ्या कचऱ्याचे संकलन, वाहतूक प्रक्रिया आणि सुरक्षित विल्हेवाट लावण्याची पद्धतशीर प्रक्रिया आहे. मात्र, कर्कश आवाजाने प्रभागात फिरणाऱ्या घनकचरा गाडीवर कामगाराच्या वाणव्याने नागरिकांना हा कचरा वृद्धासह गरोदर महिलांना हा कचरा टाकावा लागत असल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या बेतालपणाने संतापाची लाट उसळत आहे.

जम्बो आकाराचा कर आकारणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाचे तिनतेरा वाजले आहे. ओला व सुका कचरा गोळा करून योग्य ठिकाणी निस्तारण्याची जबाबदारी कामगारांकडून केल्या जाते.मात्र, कामगारांचे वेतन किमान वेतनानुसार होत नसल्याने व कंत्राटाची मुदत संपल्याने घनकचरा गाडीवरील कामगार बंद करण्यात आले. त्यामुळे घरगुती नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत स्वतः हा कचरा गाडीत टाकण्याची नामुष्की प्रशासनाच्या बेतालपणाने नागरिकांवर ओढावली आहे. किंबहुना प्रभागाच्या बऱ्याच ठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्याचे ढिगारे खितपत पडून असल्याचे वास्तव आहे.

परिणामी, दुसरीकडे जम्बो कर आकारण्यासाठी प्रशासन कुचराई करत नसला तरी प्रभागात कर्कश आवाजाने फिरणाऱ्या घनकचरा वाहनात कामगारच नसल्याने प्रशासनाचा हा बेदखलपणा पर्यावरणासह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणत आहे.

तूर्तास तात्पुरत्या स्वरूपाचा कंत्राट असला तरी घनकचरा गाडीवर कामगार अनिवार्य आहे.काही दिवसात होणाऱ्या सभेत हा गंभीर विषय प्रामुख्याने मार्गी लावू

        राधिका देशमुख

कर / प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत कार्यालय, मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment