काळीमा..! ती निरागस..लचके तोडले अन पोटात अंकुरही वाढवले

 

– तो मी नव्हेच म्हणून विवाहित युवकाचा गावातून पोबारा

– मारेगाव पोलीस मागावर 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

ती अल्पवयीन.लहानपणापासू न आजारपणाने ग्रासलेली.तिच्या कुटुंबासमवेत नराधमाचे मधुर संबंध. मात्र, त्याची नियत तिच्यावर. प्रेमाची सलगी वाढवत थेट शरीरसंबधापर्यंत.यात तिच्या पोटात अंकुर वाढत असतांना अचानक प्रकृती बिघडली. मायबापांनी दवाखान्यात नेत सारे बिंग फुटले.

पोलिसात धाव. तक्रार व तो नराधम पसार.पोलीस मागावर. ही समाजमनाला काळीमा फासणारी घटना मारेगाव तालुक्यात घडल्याने “त्या” नराधमा विरोधात कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

समाजमन सुन्न करणारी मारेगाव तालुक्यातील एका गावात घडली. किशोर विक्रम आत्राम या पंचेवीस वर्षीय विवाहित युवकाने गावातच एका कुटुंबाशी मधुर कौटुंबिक संबंध असणाऱ्या नात्याला सुरुंग लावला.यातील अल्पवयीन व सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीशी वेगळेपणाची सलगी वाढवत शरीराच्या जाळ्यात ओढले.हा क्रम त्याचा नियमित सुरु असतांना तिच्या प्रकृतीत बिघाड झाला.

सिकलसेल आजारामुळे तब्बेत बिघडली असावी म्हणून आईवडिलांनी वणी येथील डॉक्टरकडे नेले. तपासणी अंती तिच्या पोटात तब्बल अडीच महिण्याचे अंकुर वाढत असल्याचा डॉक्टरांच्या रिपोर्टने आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

थेट मारेगाव पोलिसात त्या विवाहित नराधम विरोधात तक्रार ‘पोक्सो’ अंतर्गत दाखल करण्यात आली.ही तक्रार नराधमाच्या कानावर पडताच गावातून धूम ठोकली. तूर्तास पोलीस त्याच्या मागावर आहे.

अलीकडेच वाढत्या अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या अमिषाचे प्रलोभणाने सामाजिक अभिसरणाचा जटील प्रश्न पालकांच्या चिंतेत भर टाकत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment