◆ मतदार मतदान केंद्रातून वापस फिरकले
◆ सूविधाचा अभाव
◆ केंद्राध्यक्ष असंवेदनशील
मारेगाव : कैलास ठेंगणे
अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र मारेगाव तालुका प्रशासनाचा ढिसाळ नियोजनामुळे मतदारांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. प्रभारी तहसीलदार तथा केंद्रप्रमुख यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे.
भाजपाने मावळते आमदार डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली असून, ‘मविआ’तर्फे काँग्रेसचे धीरज लिंगाडे मैदानात आहेत. त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनिल अंमलकार, आम आदमी पुरस्कृत डॉ. भारती दाभाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे किरण चौधरी आदी उमेदवारही रिंगणात आहेत.
या निवडणुकीचे मतदान केंद्र येथील मारेगाव तहसील कार्यालय येथे होते. मात्र सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरुवात झाली. दुपारी दीड वाजता दरम्यान मतदारांच्या रांगा लागल्या. यावेळी महिला मतदारांकरिता स्वतंत्र निर्मिती करण्यात आली. मात्र तबल दोन तास मतदारांना सतत रांगेत उभे राहावे लागल्याने प्रचंड असह्य त्रास सहन करावा लागला. यावेळी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा मतदान करण्यात आली नव्हती या शोकांतिकेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येऊन आल्या पावली काही मतदार परत गेले. मतदानाची टक्केवारी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कमी झाल्याची चर्चा मतदान केंद्रास्थानी होती.