Breaking News

बिंग फुटले… बेंबला कालव्याचे काम निकृष्ट : घटनास्थळी पंचनामा

◆ नाल्याची वाळु मिश्रित कामे अधोरेखित
◆ शेती खरडल्या गेल्याने कारवाईकडे लक्ष 

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

बेंबळा कालवा प्रकल्पाचे काम मारेगाव तालुक्यात जोमाने व तेवढ्याच दर्जाहीन पद्धतीचा सपाटा सुरू असून रस्त्यावरील पूल , मायनर , मुख्य कालव्याची नाली बांधकामात वापरण्यात येणाऱ्या कामात नालीची वाळू अधिकाधिक प्रमाणात वापर होत निकृष्ठ कामावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.परिणामी आज शनिवारला महसूल पथकाने घटनास्थळी पंचनामा केल्याने कालव्याचे कामे निकृष्ठ दर्जाचे होत बिंग फुटल्याचे अधोरेखित झाले.मात्र या सकारात्मक पंचनाम्याने कुणावर व केव्हा कारवाई होईल हा प्रश्न सर्वांसाठी अनुत्तरित आहे.
मारेगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.चिंचमंडळ , धानोरा , कोसारा शिवारात सुरू असलेल्या रस्त्यावरील आऊटलुट च्या कामातील पूल , मायनर , मुख्य कालव्याकडे जाणारी सिमेंट काँक्रीटीकरण नाली वरील कामात वापरण्यात येणारी वाळू चक्क नाल्याची ८० टक्के तर नदीची केवळ २० टक्के वापर करण्यात येत आहे.त्यामुळे हे कामे निकृष्ठ दर्जाकडे वळण घेत असल्याचा पंचनामा महसूल विभागाचे अधिकारी , तलाठी यांनी करून लवकरच उपविभागीय अधिकारी यांना याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत.
दरम्यान , रॉयल्टी नसतांना संबंधित विभाग अवैध रेतीचे हेराफेरी करीत बांधकामात दर्जाहीन स्वरूप आणत मोठा आर्थिक मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा येथील अभियंता व कंत्राटदार यांनी चालविला आहे.

निकृष्ठ दर्जाच्या कामाने यंदाच्या हंगामात कालव्याचे पूल फुटून शेकडो हेक्टरवरील शेतात पाणी जाऊन शेताला नदी – नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. किंबहुना शेकडो हेक्टर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे पिके उध्वस्त झाली होती यास केवळ प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अजूनही ताज्या आहेत व कारवाई शून्य आहे.

फौजदारी गुन्हे दाखल करा : शेतकऱ्यांची मागणी
प्रकल्पाचे बोगस कामे करून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले कंत्राटदार व अभियंता यांनी संगनमत करीत सदरील कामात मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा चालविला आहे.यांच्या बेताल कामाने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे.अहवाला अंती कोणावर कशी कारवाई होते याकडे सर्वांचे नजरा खिळल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment