Breaking News

अखेर नगरसेवकास जामीन मंजूर

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव येथील बहुचर्चित लाच प्रकरणातील आरोपी नगरसेवक अनिल गेडाम यास केळापूर सत्र न्यायालयाने आज तीन दिवसानंतर शनिवारला जामीन मंजूर केला.त्यामुळे त्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला.बुधवार पासून अनिल गेडाम तुरुंगवास मध्ये होता.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक अनिल गेडाम यांनी एक दारू दुकान हटविण्याची तक्रार दाखल केला होती.तक्रार मागे घेण्यास पाच लाखाची मागणी करण्यात आली होती.तडजोडीत ३ लाखाच्या सेटींग मध्ये एडवांस रुपात ९० हजार रुपये घेण्याचे ठरले असतांना ही लाच घेतांना नगरसेवक मागील बुधवारला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. अन तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
दरम्यान ,नगरसेवकाच्या कारागृहातील मुक्कामाच्या आज चौथ्या दिवसाला केळापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.परिणामी ,जामिनावर सुटका झाली असली तरी या न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा ससेमिरा केस चा निकाल लागे पर्यंत कायम राहणार आहे.
संपूर्ण जिल्हाभर खमंग चर्चेची मेजवानी ठरलेले लाच प्रकरण आता नवीन वळण घेत आहे. आरोपी नगरसेवकला अपात्र करण्याठी काही नगरसेवकांनी दंड थोपटल्याची ‘विटा’ ला माहिती मिळाली आहे.
दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयाने जमानात मंजूर करतांना आरोपी अनिल गेडाम वर अनेक अटी व शर्ती टाकल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment