Breaking News

मारेगाव लाच प्रकरण… नगरसेवकाचा जेल मुक्काम वाढला

 

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

तब्बल नव्वद हजाराच्या लाच प्रकरणात अडकलेल्या मारेगाव येथील नगरसेवक अनिल गेडाम याचा जेल मुक्काम वाढला.
केळापूर येथील सत्र न्यायाधीश पी.बी. नाईकवाड आज रजेवर असल्याने जमानात चे प्रकरण केळापूर चे दुसरे सत्र न्यायाधीश एच. एस. सातभाई यांच्या न्यायालयात ठेवण्यात आले. मात्र यावर न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. यामुळे विद्यमान नगरसेवक अनिल गेडाम याचा तूर्तास मुक्काम यवतमाळ कारागृह येथे लांबला आहे.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 13 चा नगरसेवक अनिल गेडाम याने एका दारू दुकानाच्या तक्रारीत 5 लाखाची मागणी केली.तडजोडीत 3 लाखाची त्याने सेटींग केली.यापैकी एडवांस म्हणून 90 हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अटकेपासून आज तिसऱ्या दिवसालाही नगरसेवक चा जेल मध्ये मुक्काम वाढला आहे.
नगरसेवकाच्या अटकेनंतर पुढे काय होणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

विदर्भ टाईम्स च्या बातमी वर नजरा

 दरम्यान या लाच प्रकरणात पुढे काय झाले, हे जाणण्यासाठी वाचकवर्ग कमालीचा उत्सुक असतो.काल संध्याकाळी न्यायालयात काय झाले याची विचारणा सातत्याने ‘वि.टा’. कडे होत होती. या प्रकरणाचे अचूक वृत्तांकन ‘विटा’ करीत असल्याने वाचक वर्गात उल्लेखनीय व प्रशंसनीय वाढ झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment