विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले मारेगाव येथील नगरसेवक अनिल गेडाम याला आज गुरुवारला केळापूर न्यायालयात हजर केले असता जमानात वर निर्णय झाला नाही.त्यामुळे अनिल गेडाम याची यवतमाळ जेल मध्ये रवानगी करण्यात आली.
मारेगाव प्रभाग १३ मधील नगरसेवक अनिल गेडाम याने एका देशी दारू दुकान हटविण्याची तक्रार केली. तक्रार मागे घेण्यासाठी दुकानदाराला चक्क पाच लाखाची डिमांड करण्यात आली. तीन लाखात सौदा पक्का झाला.ऍडव्हान्स म्हणून काही रक्कम काल घेण्याचे ठरले.
याच तडजोडी काल बुधवारला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीत ९० हजार रुपये घेतांना अनिल हा अलगद जाळ्यात अडकला.
बहुदा एखादा नगरसेवक एसीबी च्या जाळ्यात अडकण्याच्या पहिल्याच घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान , लाच घेतलेल्या व अटकेत असलेल्या नगरसेवकास आज केळापुर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या न्यायालयात हजर केले असता जामीन अर्जावर सूनवाई पूर्ण झाली नाही. यामुळे नगरसेवकाची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
कालच्या या घटनेने लोकसेवकात प्रचंड धास्ती बसली आहे. विशेष म्हणजे आजच मारेगाव येथील सर्व नगरसेवक यांचा कार्यकाळ एक वर्षाचा पूर्ण झाला आहे. वर्षे पूर्ण होण्याआधीच एका नगरसेवकाचा गेम होणे याची चौकाचौकात खमंग चर्चा होत आहे, हे येथे उल्लेखनीय.