मारेगावचे नगरसेवक अनिल गेडाम यांना ९० हजाराची लाच घेताना अटक

◆ दारूचे दुकान हटविण्याची होती मागणी
◆ दारू दुकानासमोरच रचला सापळा अन अलगद अडकला

मारेगाव : दीपक डोहणे

मारेगाव प्रभाग १३ मधील देशी दारूचे दुकान हटविण्यासंदर्भात तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात नगरसेवक अनिल उत्तम गेडाम यांना तब्बल नव्वद हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याने मारेगाव तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.परिणामी यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आज बुधवारला दुपारी साडेबारा वाजताचे दरम्यान कान्हाळगाव रोडवर केली.
प्राप्त माहितीनुसार , मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मधील अनिल गेडाम हे विद्यमान नगरसेवक आहे.येथील प्रभागात मागील अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे.सदर देशी दारू दुकान हटविण्यासाठी नगरसेवक यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार मागे आणि मायाजालेसाठी अनुज्ञप्ती धारकाकडे तगादाही सुरू होता.
नगरसेवकाच्या तगाद्याने हतबल झालेल्या अनुज्ञप्ती धारकाने थेट अमरावती / यवतमाळ लाच लुचपत विभागाकडे तक्रार देत आज दि.१८ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताचे दरम्यान कान्हाळगाव रोड वर पथकाने सापळा रचत नगरसेवक अनिल गेडाम यांना ९० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप , अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत , देविदास घेवारे , पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर , ज्ञानेश्वर नालट , अब्दुल वसीम , महेश वाकोडे सचिन भोयर , सुधीर कांबळे , राहुल गेडाम यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment