मारेगावच्या आदर्श हायस्कूलची शैक्षणिक सहल शिवतीर्थावर

◆ पर्यटना बरोबर अभ्यासाच्या उपक्रमात १५२ विद्यार्थी रवाना

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

सहल म्हटली की औत्सुक्याचा भाग आलाच.विद्यार्थी दशेत शालेय सहली आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्या पर्यंटना बरोबर त्या माहितीपूर्ण आणि अभ्यासाचे भान राखले जावे या करिता मारेगाव येथील आदर्श हायस्कुलची एकदिवसीय शैक्षणिक सहल नागपूर शिवतीर्थावर आज बुधवारला सकाळी रवाना झाली.

शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून शैक्षणिक सहलीकडे बघितल्या जाते.शैक्षणिक दृष्टींने महत्वाचे असणाऱ्या स्थळावर विद्यार्थ्यांना घेऊन जाने , परिवर्तन करणे हा अभ्यासाचा भाग असतो.विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे हा शैक्षणिक सहल काढण्यामागे संस्थेचा प्रामुख्याने उद्देश असतो. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान , निरीक्षण , प्रयोग क्षमता आदींचा किमान विकास होईल असे जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाते.
शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांत आपलेपणा , नाते निर्माण होईल. अनौपचारिक शिक्षण सहलीतून जितके होते तीच सहल स्वावलंबनाचा गुंफण तयार करते.हा सकारात्मक उद्देश ठेवून मारेगाव येथील आदर्श हायस्कूलची शैक्षणिक सहल नागपूर शिवतीर्थावर आज सकाळी रवाना झाली असून चार बसेस मध्ये १५२ विद्यार्थी – विद्यार्थिनी ना ज्ञानार्जन करणारे सुरशे सर , पोटे सर , उरकुंडे सर , मोरे सर , ढोके सर , भालेराव सर , सावसाकडे मॅडम ,आगुलवार मॅडम , राठोड मॅडम , लिपिक चोपणे समवेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment