◆ तिघे गजाआड : मारेगावातून चोरल्या होत्या शेळ्या
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील शेड मधून शेळ्या चोरून यवतमाळ पसार झालेल्या चोरट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली.अवघ्या अकरा तासात या धडक कारवाईने तिघे आरोपी मारेगाव ठाण्यात गजाआड आहे.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक तीन मधील संजय तुरारे यांच्या मालकीच्या तीन नग शेळ्या दि.३१ च्या पहाटे शेड मधून चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.तुरारे यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रारी अंती पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरविली.
दरम्यान , वणी येथील तीन चोरट्यांनी शेळ्या लांबवितांना मारुती कार एम.एच.३४ सी.८५०१ क्रमांकाचे वाहन वापरीत थेट यवतमाळ कडे रवाना झाले. परिणामी पोलिसांची यंत्रणा चौफेर मागावर असतांना यवतमाळ स्थित मारुती कार सह शेळ्या व रिच नामदेव वाटेकर (१९) , सुजल अजय मोटे (१९) व एक विधी संघर्ष बालक यांना दुसऱ्या दिवसाला दुपारी अटक केली. किमान ८० हजाराच्या मुद्देमाल सह आरोपींना मारेगाव ठाण्यात गजाआड करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार , ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार , संजय वारेकर , अफजल पठाण , राजू टेकाम पुढील तपास करीत आहेत.