– कमलताई कविश्वर काळे यांचे निधन
– दुपारी 1 वाजता होणार अंत्यविधी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद काळे यांच्या मातोश्री कमलताई कविश्वर काळे यांचे दि. 31 आँगष्ट रोज सोमवारला रात्री 10.30 वाजताचे दरम्यान हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे 80 वर्ष वय होते.
येथील प्रभाग क्रमांक 9 मधील वास्तव्यात असलेल्या काळे कुटुंबातील वयोवृद्ध मातोश्री कमलताई यांची प्रकृती ठणठणीत होती. सोमवारला रात्री जेवण करून आराम करीत असतांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. लागलीच मुलगा प्रमोद यांनी वणी येथील खासगी रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.मनमिळावू स्वभाव अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. कमलताई कविश्वर काळे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई,नातवंड असा आप्तपरिवार आहे.
आज दुपारी 1 वाजता मारेगाव येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.