धक्कादायक… मारेगावच्या आश्रम शाळेत विद्यार्थिनी सोबत छेडछाड

 

– अधिक्षिकेच्या पती विरोधात गुन्हे दाखल

मारेगाव – विटा न्युज 

मारेगाव येथील आश्रम शाळेतील अधिक्षिकेला निलंबित केल्याचा आकस मनात ठेवून तिच्या पतीने रात्री थेट वसतीगृहात जात विद्यार्थिनी सोबत छेडछाड केल्याची धक्कादायक घटना मारेगाव येथे घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

 

येथील स्व.चिंधुजी पुरके आश्रम शाळेत अधिक्षिका म्हणून कार्यरत कीर्ती बावणे यांचे कर्तव्यात कसूर प्रकरणी 8 आँक्टोम्बर रोजी निलंबन करण्यात आले होते याचाच आकस मनात ठेवत तीचा पती संजय बावणे याने रात्री 10 वाजताचे दरम्यान बेकायदेशीर कृत्याच्या उद्देशाने वसतीगृहाच्या मागच्या बाजूने येत आतमध्ये प्रवेश केला.यात पाच ते दहावीच्या काही विद्यार्थिनींना छेडछाड केल्याचा प्रकार उजेडात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान या प्रकरणाची फिर्याद मुख्याध्यापिकेने मारेगाव पोलिसात केल्याने संजय बावणे याचे विरोधात पोक्सो अंतर्गत भांदवी 303,(2) 115 (2),74,3 व 3(5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.परिणामी, या घृणास्पद प्रकाराने संशायित आरोपी विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment