– सेवानिवृत्ताचे औचित्य
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
कान्हाळगाव युगांतर प्राथमिक आश्रम शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर ढोके हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती नंतर त्यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक गौरव करण्यात आला.
तब्बल 32 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सेवेकाळात ढोके सर यांनी पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना सुसंस्कृतीक करून त्यांचे भविष्य घडविण्याचे मोलाचे कार्य अधोरेखित ठरले.
सपत्नीक झालेल्या गौरव समारंभात माध्य. मुख्याध्यापक संजय पाटील अध्यक्षस्थानी तर प्राथ. मुख्याध्यापक प्रशांत परचाके, विजयराव काटवले, प्रकाशराव घाटे, सुरेशराव काकडे, से. नि. शिक्षक दिनेश वैद्य यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर ढोके व त्यांच्या सुविद्य पत्नी नंदाताई यांचा शाल, श्रीफळ, ड्रेस व साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी वैयक्तिक भेटवस्तू देत गौरव करीत शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उपरे तर प्रदीप खामणकर यांनी आभार मानले.