– कर्करोगाच्या झुंजीचा अखेर
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील देवा चिकन सेंटरचे संचालक तथा प्रभाग क्रमांक 13 येथील नागरिक देवसिंग (देवा ) महादेव कोवे (45) यांचे आज शुक्रवारला पहाटे चार वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.
देवा कोवे यांना गेल्या तीन वर्षांपासून कर्करोग आजाराने घेरले होते. त्यांच्या तोंडाला झालेल्या कर्करोगाची पुणे येथील खासगी रुग्णालयात शस्रक्रिया झाली होती. मध्यंतरी प्रकृतीत सुधारणा झाली असतांना अचानक गत काही दिवसापासून या दुर्धर आजाराने पुन्हा कवेत घेत आज पहाटे अखेर केला.
देवा कोवे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. मृतक देवा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. सायं. 4 वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.