– लगाम लावण्यास संबंधित विभागाकडे तक्रार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
गाव तिथं मोठ्या प्रमाणात पानटपरी असा बेरोजगार युवकांचा व्यवसाय.पान मटेरियल व्यवसाय धारक मोठ्या प्रमाणात थेट गाव पोहच सुगंधित तंबाखू पोहचवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संबंधित विभागाच्या आशीर्वादाने आलबेल सुरु तर नाही ना? अशी साशंकता असतांना शाळकरी विद्यार्थ्यांना व्यसनाचा आजार जडल्याचे विदारक चित्र धोकादायक ठरत आहे.
मारेगाव शहरात अर्धा डझन पेक्षा अधिकचे व्यवसाय धारकांचा तालुका स्थळावर सुगंधी जाफराणीचा व्यवसाय तेजीत सुरु आहे. तालुक्यात मारेगाव सह शेकडो गावात पाहिजे त्या ठिकाणी पानटपरी हा बेरोजगार युवकांचा व्यवसाय करीत असतांना बनावट जाफराणीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.
अलीकडेच शासनाकडून बंदी असलेल्या सुगंधित जाफराणी ची विक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात असतांना शाळकरी विद्यार्थ्यांसह महिलाही जाफरानी युक्त खर्राच्या आहारी गेले असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.
शहरातील नामांकित व्यवसाय धारकांना लगाम लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रशासन नेमकी कधी व कशी कारवाई करते याकडे जनतेच्या नजरा खिळल्या आहे.