– मारेगावातील घटनेने हळहळ
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
पितृतुल्य हरविलेल्या एकुलत्या एका मुलाने घरी कोणीच नसतांना गळफास घेवून इहलोकाची यात्रा केल्याची दुर्देवी घटना मारेगाव येथे आज रविवारला दुपारी 3 वाजताचे सुमारास उघडकीस आल्याने शोककळा पसरली आहे. संकेत शशिकांत कोरले (22)असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
शेतकरी कुटुंब असलेल्या वडिलाचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते.आई, मुलगी व मुलगा असे तिघे कुटुंबात असतांना आई सातत्याने शेतात राबायची तर धाकटी मुलगी उमरी येथे नर्स चे शिक्षण घेत होती. दरम्यान, संकेत हा यवतमाळ येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता. काही महिन्यापासून तो मारेगाव येथेच असायचा.
आज रविवारला संकेत हा स्वगृही एकटाच असतांना गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण अजून अस्पष्ट असून संकेतच्या टोकाच्या निर्णयाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.