– उद्या मुंबईत शिक्कामोर्तब
– आशिष खुलंसंगे, गजानन किन्हेकर यांचा समावेश
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
राजकारणातील पक्षांतर नविन नाही. मात्र स्थिरावलेल्या पक्षात घुसमट होत असेल तर दुसरा पर्याय निवडतात. असेच राजकारणातील वेगळी वाट शोधत उपविभागात उद्या मोठा राजकीय भूकंप होणार आहे. काँग्रेस व उबाठा पक्षाचे महत्वपूर्ण आजी माजी पदाधिकारी थेट मुंबईत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात धनुष्यबाण हातात घेत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे.
वणी उपविभागात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी / कार्यकर्त्यांची, अनेक दिवसापासून होत असलेली गळचेपी आता चव्हाट्यावर येत आहे.यामुळे नाईलास्तव विजनवासात गेलेले राजकीय धुरंधर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यात काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वणी वसंत जिनिंगचे माजी सभापती असलेले दिग्गज नेते आशिष खुलसंगे, मारेगावचे सर्वमान्य कुशल नेते,माजी सरपंच गजानन किन्हेकर यांचेसह वणी, झरी व मारेगाव येथील माजी आजी नगरसेवक, सरपंच तथा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षातून काडीमोड घेत उद्या शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती “विटा” ला प्राप्त झाली आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने वणी उपविभागात शिंदे सेनेला आगामी काळात बळ मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकात प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विधानसभेत “राजे” नावाने प्रख्यात असलेले आशिष खुलसंगे हे काँग्रेस च्या माजी आमदाराचे अत्यंत निकटवर्ती असतांना वेगळी वाट का शोधावी लागली हा गहन प्रश्न चर्चीला जात आहे. त्यांच्या मागे त्यांना मानणारा मोठा राजकीय वर्ग आहे. सर्वच पक्षात त्यांचे मोठे संबंध देखील आहे.यासोबत काही वर्षांपूर्वी मारेगाव काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या माजी सरपंच गजानन किन्हेकर यांचीही राजकीय घुसमट काँग्रेसला चिंतन करायला भाग पाडणार. एकंदरीत हा पक्ष प्रवेशाचा राजकीय भूकंप आता कुणाला भुईसपाट करेल हा येणारा काळ ठरविणार आहे.