काँग्रेस / उबाठा ला खिंडार…. अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नंदनवन’ येथे पक्षप्रवेश

– आशिष खुळसंगे गजानन किन्हेकर, दीपक कोकास यांच्या सह 11 दिग्गजांनी हातात घेतला धनुष्यबाण
मारेगाव : दीपक डोहणे
वणी उपविभागात मोठ्या राजकीय घडामोडीत दिग्गज नेत्यांनी काँग्रेस व उबाठा पक्षाला रामराम करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील नंदनवन निवासी पक्ष प्रवेश करीत आज धनुष्यबाण हातात घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून पक्षातून दुरावलेल्या नेत्यांनी पक्षत्याग करून शिवसेना (शिंदे गटात ) पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या पक्ष प्रवेशात वणी उपविभागातील झरी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष, माजी जि. प. सदस्य तथा वसंत जिनिंग वणी येथील माजी अध्यक्ष आशिष खुळसंगे , उबाठा चे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, मारेगाव विविध कार्य. सह. संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते गजानन किन्हेकर, उबाठाचे माजी नगरसेवक राजु तुरणकर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज मुंडे, अडेगाव येथील माजी सरपंच डॉ. मारोती माशेलकर , मारेगावचे माजी सरपंच विलास निखाडे, सोमेश्वर गेडेकर, गोपाल खामणकर, शरद पवार गटाचे यवतमाळ शहर उपाध्यक्ष नितीन निघोट यांचा समावेश आहे.

दरम्यान, यात चाणक्य असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या विरोधी पक्षात प्रामुख्याने पदाधिकाऱ्यात धुसमूशीने व पक्षातून सोडचिठ्ठीने चिंतनाचा गहन विषय उभा ठाकला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment