Breaking News

वृत्तनामाचे संपादक नरेंद्र वैरागडे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड

मारेगाव पत्रकार संघटनेकडून अभिनंदनाचा वर्षाव

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील पत्रकार नरेंद्र वैरागडे यांची अखिल  भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने माध्यम क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यापूर्वी महाराष्ट्र डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेत वैरागडे यांनी विदर्भ कार्याध्यक्ष या पदावर कार्यभार सांभाळला होता. आता माध्यम संघटना भारतीय स्तरावर कार्यरत आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने,   विकास भोसले   महासचिव आणि  सतीश सावंत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी नरेंद्र वैरागडे यांची नियुक्ती केली आहे.
             
नरेंद्र वैरागडे मागील 35 वर्षा पासून माध्यम क्षेत्रात अविरत कार्यरत आहे.तूर्तास ते वृत्तनामा न्युज 24 या डिजिटल चॅनल चे ते संपादक आहेत.आपल्या न्यायिक लेखणीतून आजतागायत त्यांनी सामाजिक, राजकीय व सांस्कृतीक चळवळीचे प्रतिबिंब उमटविले. त्यांच्या लेखणीची आणि कार्याची दखल घेत अ. भा. डिजिटल मीडिया राज्य पत्रकार संपादक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे मारेगाव तालुका प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment