मारेगावात आज प्रशासकीय आढावा बैठक

खा. प्रतिभाताई धानोरकर प्रमुख उपस्थिती

– समस्यांच्या कात्रीत सापडलेल्या जनतेचे होईल निरसन

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

तालुक्यातील विविध समस्या ऐरणीवर असतांना कोलमडलेल्या व्यवस्थेने सामान्य जनता वेठीस धरल्या जात आहे.यावर तात्काळ अंमल करून निरसन करण्यासाठी आज गुरवारला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय आढावा बैठक आयोजित आहे.

 

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 होणाऱ्या आढावा बैठकीत कात्रीत सापडलेल्या तालुक्यातील विविध समस्यांचा महापूर येणार आहे. अनेक शासकीय प्रशासकीय कामाने सर्वसामान्य जनता सह कृषी प्रधान देशाचा पोशिंदा आपल्या समस्याचे गाऱ्हाणे मांडणार आहे. त्यांचे निरसन करून अंमल कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष खिळणार आहे.

 

तालुक्यातील तमाम समस्याग्रस्थानी आपल्या प्रशासकीय अडचणी असल्यास तोंडी व लेखी निवेदना मार्फत देण्यात यावे.असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment