बुद्धजयंती
तथागत भगवान गौतम बुद्धानी मानव कल्याणासाठी म्हणजे एक सर्वसामान्य मानव म्हणून आपली शिकवण जगातील सर्व मानव कुठलीही आमिष किंवा जबरदस्ती नसताना त्या शिकवणी मध्ये साधारणतः पाच प्रकारचे नियम साधे आणि सोप्या पद्धतीने पालन केले तर तो व्यक्तीच नाही तर कुटुंब एक सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो.
तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो.बुद्धाने अलौकिक जन्म किंवा दैवी सामर्थ्या लाभल्याचा दावा केला नाही.तर तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या.मी तुम्हाला मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने तुम्ही गेलेच पाहिजे ही कल्पना केली नाही ” मी मार्गदाथा आहे मोक्षादाता नाही”अशी त्यांच्या कुतितून आपणास जाणीव होते ही शिकवण देवाने नाखूष मानवतेच्या काळात द्यावी तशी दिली नाही.तर केवळ एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाची कशा प्रकारे राहावे व्यवहार करावे.हा उपेदश केला.त्यांनी केवळ सल्ला दिला आहे.
उत्तेजन दिली आहे.आणि स्फुती दिली आहे त्याने लोकांना उचलून घेऊन आध्यात्मिक जीवनाच्या ध्येयापर्यंत नेऊन ठेवलेले नाही,तर त्या ध्येयापर्यंत आपल्या दोन पायांनी चालत ते कसे पोहोचू शकतात त्याचा मार्ग दाखविला आहे बुद्धाच्या २५०० वर्षाच्या काळातील आपण आशिया खंडातील बौद्ध देशाची प्रगती ही दैदिप्यमान दिसून येईल.कारण बुद्ध धम्म लोकोपयोगी बनवायचा असेल तर त्यात मोठ्या प्रमाणात काट-छाट करण्याची आवश्यकता आहे.त्या दुष्टीने आपल्या धम्मात काट-छाट करण्याचे बुद्धांने दिलेले स्वातंत्र्य म्हणजे बौद्ध धम्म या आधारावर नव्हे तर बुद्धी आणि अनुभवावर आधारित आहे.म्हणुनच अल्यावधित भारतात बौद्धांची जी प्रगती दिसते त्याचे मुख्य कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्म दिक्षा होय ज्या दिक्षेमुळे लाखो करोडो लोक आज आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला तरीपण बाबासाहेब बौद्धमय भारत आजही घडवू शकलो नाही.आज बौद्धांची जी शैक्षणिक सांस्कृतिक प्रगती दिसते ते बाबासाहेब यांचा वारसा आहे.पण एक आदर्श समाज अजूनही बनवू शकलो नाही.
बुद्ध असे म्हणतात,”रिशतोंकी सिलाई अगर भावनाओं से हुई है, तो टुटना मुश्किल है” और अगर स्वार्थ से हुई है, तो टिकना मुश्किल है…
स्वार्थ ठेऊन कोणत्याही व्यक्तीने खूप काम केले तर त्या कामाचे मूल्य हे शून्यच राहणार भारताला महासत्ता व्हायचे असेल तर बुद्धाचे विचार तारू शकतात.
बहुजन हिताय, बहुजन सुखाय.. तुझ्या हितामध्ये माझे सुद्धा हित आहे….
सबका मंगल हो,
सबका मंगल हो,
सबका मंगल हो,
लेखक,
हरिभाऊ हिरामण दारूंडे
वरोरा.
9767604542.