– मार्डी परिसरात तीन वाहनावर कारवाई
मार्डी : केशव रिंगोले
वाळू तस्करीच्या चर्चेत असलेल्या मार्डी परिसर आता अवैध मुरूम उत्खणन करीत प्रशासनासमोर आव्हान उभे करीत आहे.परिणामी , मुरूम तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वाहनावर महसूल प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केल्याने तस्करांत धास्ती निर्माण झाली आहे.
विना परवाना मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कार्यवाही करीत मार्डी परिसरातून मुरूम भरून तिन ट्रॅक्टर मार्डी कडे येत असल्याची माहिती शुक्रवार च्या रात्री गस्तीवर असलेले मंडल अधिकारी अमोल गुघाने यांना मिळताच पथक कार्यान्वित करीत मार्डी येथील पेट्रोल पंप जवळ मुरूम भरून येत असलेल्या ट्रॅक्टरवर छापा टाकला.
यावेळी चालका कडे तपासणी केली असता त्यांना तीन ट्रॅक्टर विना परवाना मुरूम वाहतूक करत असल्याचे आढळले. त्यामुळे त्या तीनही ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. हीं कारवाई शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रात्री सुमारे 1 वाजता करण्यात आली असून तीनही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
मार्डी परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध मुरूम वाहतूक सुरू असल्याची चर्चा मण्डल अधिकारी अमोल गुघाणे, तलाठी शिंगाने, तलाठी कुळमेथे, यांना मिळताच त्यांनी प्रत्यक्ष तपासणी करून तीन ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली आहे.या प्रकरणी ट्रॅक्टर मालक रत्नाकर जुमडे मार्डी, अभय जुमडे मार्डी, सुबोध शर्मा मार्डी या तीन ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तहीलदार दीपक पुंडे यांच्या मार्गदर्शनात मण्डल अधिकारी अमोल गुघाणें, तलाठी शींगाने, तलाठी कुलमेथे, वाहन चालक विजय कनाके , कोतवाल लहू भोंगळे यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान , वाळू तस्कराने बहुचर्चेत असलेल्या परिसराला आता मुरूम तस्करी साठी जाळे विणत असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल घशात घालण्याचे षडयंत्र राबविण्यात येत आहे.प्रशासना कडून पारदर्शकतेची कार्यप्रणाली अवलंबवून तस्करांचे मुसके आवरण्याचे कार्य मात्र येथे कायम असणार असल्याचे सूतोवाच तहसीलदार दीपक पुंडे यांनी “विटा” ला केले.