– मारेगावात सभासद मेळावा उत्साहात संपन्न
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
गुंतवणूकदार, कर्जदार व अभिकर्ता यांच्या अतूट विश्वासाचा परिपाक म्हणून रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थने तळागाळापर्यंत वटवृक्ष उभा केला. यात सर्वांच्या दृढ विश्वासाने व सहकार्याने हा वटवृक्ष अवघ्या महाराष्ट्रात विशाल करण्याचा मनोदय असल्याचा आशावाद पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. देविदास काळे यांनी व्यक्त केला.
ते मारेगाव येथे आंतराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित शनिवारला सभासद मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.मेळाव्याचे उदघाटन सहा. निबंधक सचिन कुडमेथे यांचे हस्ते झाले.आमदार संजय देरकर,सहा. निबंधक सुरेश इंगोले, माजी जिप. सभापती अरुणाताई खंडाळकर, बाजार समितीचे वसंतराव आसूटकर, सेवानिवृत्त व्यवस्थापक सह सर्व संचालकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी मंचावरील प्रमुखांकरवी गत 35 वर्षांपासून उभारलेल्या रंगनाथ पतसंस्थेच्या वाटचालीचा परामर्श व लेखाजोखा विषद करण्यात आला.
संस्थेकडून व संचालककडून वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांस मदतीचा आर्थिक सहाय्य देण्यात आले.यासोबत ठेवीदार, नियमित कर्जदार, व्यवस्थापक व अभिकर्त्यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार संजय देरकर यांनी संस्थेचे प्रमुख यांच्या अथक परिश्रमाने व सकारात्मक संकल्पनेने आणि त्यांना जोड असलेल्या संचालक मंडळाची विश्वासहर्ताने पतसंस्थेचे जाळे विणल्या जात असून हे सहकार क्षेत्रात वाखान्याजोगे असल्याची भूमिका विषद केली.सुरेश इंगोले, सचिन कुडमेथे, अरुणाताई खंडाळकर, अरविंद ठाकरे, उदय रायपुरे यांनीही आजतगायत पतसंस्थेवरील विश्वासाचा आपल्या भाषणातून लेखाजोखा मांडला
मेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश बरडे यांनी केले. अशोक कोरडे यांनी सूत्रसंचालन तर विलास होलगीरवार यांनी आभार मानले.