Breaking News

निवड… युवा सेना तालुका संघटक पदी तुकाराम वासाडे

 

– मारेगाव तालुका शिवसेना (शिंदेगट )विस्ताराची जबाबदारी 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट ) पक्षाची पकड मजबूत करीत पाय रोवत असतांना पक्षाला बळकटी व विस्तारासाठी युवा सेना तालुका संघटक म्हणून तुकाराम पांडुरंग वासाडे यांची निवड करण्यात आली आहे.

 

आगामी काळात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूका व पक्ष बांधणीचा जोरकस प्रयत्न राजकीय पक्षांनी चालविला असून मारेगाव तालुका शिवसेना (शिंदे गट ) पुरता सक्रीय होवून तालुक्यात संघटन बांधणी करण्यासाठी युवा सेनेचे तुकाराम वासाडे यांचेकडे मारेगाव तालुका संघटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे , मुख्य नेते एकनाथजी शिंदे,पालकमंत्री संजयजी राठोड, युवासेना कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिंदे, पूर्वेशजी सरनाईक यांच्या निर्देशनानुसार ही संघटन जबाबदारीची निवड करण्यात आली आहे.

 

तुकाराम वासाडे यांच्या निवडीचे श्रेय ते जिल्हाप्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, लोकसभा प्रमुख विशाल गणात्रा यांना देतात. पक्ष मजबुतीसाठी झालेल्या वासाडे यांच्या निवडीचे पक्षात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment