– वेगाव च्या संशायित आरोपीवर गुन्हे दाखल
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
ती मारेगाव तालुक्यातील. मारेगावात मैत्रिणीचे लग्न समारंभ आटोपून मारेगावात असलेल्या मैत्रिणीकडे पायदळ जात असतांना मागावून तो आला.आणि अश्लील भाषेत शिविगाळ करीत नको ती मागणी करीत तिला छेडू लागला.
अचानक घडलेल्या प्रसंगाने ती पुरती गोंधळून घाबरत थेट पोलिस स्टेशन गाठले. तक्रार केली अन त्याच्यावर गुन्हे दाखल झाले.ही घटना आज रविवारला दुपारी मारेगावात शासकीय मुलांच्या वसतिगृहा मागे घडली.
ती महाविद्यालयातील विद्यार्थिनी.मारेगावात आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला आज आली.लग्न आटोपून दुपारी तीन वाजताचे सुमारास प्रभाग क्रमांक 16 मधून मैत्रिणीकडे जात होती.संशायीत आरोपी मनोज पुंडलीक माहुरे (27) रा.वेगाव ता. मारेगाव हा मोटारसायकलने मागावून आला.
तिला थांबवित अश्लील भाषेत शिविगाळ करीत नको ती भाषा वापरीत मागणी केली.एवढेच नव्हे तर तिची छेडछाड करण्यावर मजल गेली.भांबावलेल्या 22 वर्षीय युवतीने थेट पोलिस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची तक्रार दाखल केली.
संशायित आरोपीवर कलम 354 , 506 , 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
संशायित आरोपीची दादागिरी
पिडीत युवती भावासोबत ठाण्यात दाखल झाली.भावासोबत त्याचा मित्र संगतीला असतांना मित्राला संशायित आरोपी याने मार्डी चौकात धाकदपट करीत मारहाण केली व तू त्यांना सहकार्य केले तर जीवे मारण्याची धमकीही दिली.मारहाणीचे अश्रू गाळत मित्र पोलिसात आला.लगेच पोलीस पथक चौकात गेले मात्र संशायित आरोपीने घटनास्थळा वरून पोबारा केला. सदर आरोपीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी पथक कार्यान्वित करत आरोपीचा मागोवा घेतला आणि रात्री साडे आठ वाजता त्याला जेरबंद केले.