– मारेगावातील ‘ती’ जागा रिकामीच
– विद्यमान ठाणेदारांनी पुढाकार घेण्याची गरज
मारेगाव : दीपक डोहणे
अतिक्रमनाने बरबटलेल्या मारेगाव शहरातील बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या जागेवर व्यापार संकुल उभारण्याच्या एका दशकांपूर्वी कमालीचा वेग आला होता.तत्कालीन अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे करवी हिरवी झेंडीही मिळाली होती.शेकडो बेरोजगारांनी आपली नावे नोंदवून हा संकुलाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला.मात्र व्यापार संकुलाचे भिजत घोंगडे आजतागायत कायम आहे.नव्हे तर हा प्रश्नच थेट मंत्रालयात आवासून उभा असून मागील अनेक वर्षांपासून ऐन मोक्यावरील रिकामीच असल्याने विद्यमान ठाणेदारांनी पुढाकार घेवून हा प्रलंबित प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुका औद्योगिक दृष्ट्या पुर्णतः मागासलेला.एकही उद्योग नसलेल्या तालुक्यात पदव्या गुंडाळून बेरोजगाराची संख्या झपाट्याने वाढत आहे.रोजगार उभारून जीवन जगण्यासाठी युवकांची धडपड कायम आहे.मारेगावात पुरेशी जागा व संकुल नसल्याने बेरोजगार युवकांचा फौजफाटाचा आलेख वाढतो आहे.
इंग्रज काळात निर्माण झालेल्या मारेगाव पोलिस ठाण्याचा परिसर विशाल आहे.वणी यवतमाळ राज्य महामार्गाला लागून असलेली बसथांबालगत ही जागा व्यवसायासाठी सर्वोत्तम मानली जाते.काही दिवसांपूर्वीच एका बाजूला पेट्रोलपंपची निर्मिती करण्यात आली. मात्र दुसरीकडील जागा रिकामी आहे.यावरच संकुल उभारण्याची गरज आहे.
तत्कालीन ठाणेदार आर.वाय. भद्रे यांनी सन 2012-2013 हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला.तेव्हापासून प्रस्ताव मंत्रालयात धूळखात आहे.पेट्रोल पंप उद्घाटन वेळी हा विषय चर्चेला आला.पोलीस महासंचालक , पोलिस अधीक्षक , आमदार महोदयांनी संकुलाचे सूतोवाच केले होते.मात्र अजूनही मूर्तरूप आले नाही.
व्यापार संकुल उभारणीने बेरोजगारांना हक्काची जागा मिळून बेरोजगार व व्यवसायाला गती मिळेल.किंबहूना पोलीस विभागालाही मोठे उत्पादन मिळेल यावर सकारात्मक विचार करूनच हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी माफक अपेक्षा व्यक्त होते आहे.
प्रशासकीय कामकाजावर उत्तम व प्रभावी पकड असलेल्या ठाणेदार राजेश पुरी यांना मारेगाव पोलिस ठाण्याचा प्रभार देण्यात आला.व्यापार संकुलची संकल्पना ठाणेदार पुरी यांनी वरिष्ठांच्या स्मरणात आणून दिल्यास हा महत्वाकांक्षी प्रश्न निकालात निघू शकतो.
मारेगाव पोलिस स्टेशन समोरील व्यापार संकुलाचे नव्याने प्रस्ताव तयार करण्यासाठी मी यवतमाळ पोलिस अधिक्षक यांना सूचना केली आहे.त्याची पूर्तताही झाली आहे. संकुल उभारणी नंतर स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य मिळेल असा माझा प्रयत्न राहणार आहे.याबाबतचा सातत्याने माझा पाठपुरवठा सुरू आहे.
-मा संजीवरेड्डी बोदकूरवार
आमदार,वणी विधानसभा क्षेत्र