Breaking News

संवेदना… माजी नगरसेविका नलिनी ताकसांडे यांचे निधन

 

– विप्लव ताकसांडे यांना मातृशोक 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

मारेगाव येथील माजी नगरसेविका आयुष्यमती नलिनी चिंतामण ताकसांडे (63) यांचे आज दि. 26 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता निधन झाले. युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विप्लव ताकसांडे यांच्या त्या मातोश्री होत्या.

 

नलिनी ताकसांडे ह्या मारेगाव नगरपंचायतच्या सन 2016 मध्ये प्रभाग क्रमांक 17 च्या नगरसेविका होत्या. त्यांनी महिला बालकल्याण सभापती पद ही भूषविले होते.मानव विकास संस्था द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे माजी सचिव, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाच्या त्या माजी अधिक्षिका होत्या.

 

आयुष्यमती नलिनी ताकसांडे ह्या गत काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होत्या. दि. 26 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 1 वाजता त्यांची स्वगृही प्राणज्योत मालविली.

 

मृत्यूसमयी नलिनी ताकसांडे ह्यांच्या पश्चात थोरली मुलगी मोनालिसा, मुलगा विप्लव,सून, नातवंड, भाऊ, बहिणी असा मोठा आप्तारिवार आहे. सायंकाळी 5 वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

(*विदर्भ टाईम्स परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली*)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment