नियुक्ती.. दयाल रोगे लाडकी बहीण योजनेवर नियुक्त

 

– मारेगाव तालुक्यातील सनियंत्रना करिता निवड 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मारेगाव तालुक्यात देखरेख करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट ) तालुका अध्यक्ष दयाल मारोती रोगे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

 

महिलात आर्थिक सुबत्ता निर्माण होवून त्यांच्यात आरोग्य व पोषणात सुधारणा व्हावी या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून तमाम महिलांना दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येणार असल्याची योजना राबविण्यात येणार आहे.

 

त्याकरिता तालुका स्तरावरील निवडक प्रशासकीय सेवेवर नियंत्रण तथा देखरेख करिता अशासकीय सदस्य म्हणून रोगे यांची निवड करण्यात आली. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिला कागदपत्राची पूर्तता करून सदरील फॉर्म भरण्यासाठी प्रशासकीय कार्यालयात तोबा गर्दी करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment