–चुनाभट्टी विरोधात सरोदी वस्तीतील नागरिकांनी थोपटले दंड
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील भालेवाडी लगत सरोदी वस्ती समोरच नागरिकांच्या जीवनाशी खेळ करणारा चुनाभट्टी प्रकल्प उभारण्यात आला त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्यच ऐरणीवर आल्याने सर्वत्र असंतोष पसरत आहे. किंबहुना या चुनाभट्टी विरोधात येथील नागरिक एकवटले असून येत्या 15 आँगष्ट रोजी रास्तारोको आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
मारेगाव कडून मार्डीकडे जाणाऱ्या अवघ्या तीन किमी. अंतरावर रस्त्याच्या कडेला सरोदी समाजाची वस्ती वसलेली आहे. शेतीपूरक सह विविधांगी व्यवसाय करून जीवन जगणाऱ्या नागरिकांना आता अगदी समोरच चुनाभट्टी उभारून आरोग्याचा प्रश्न निर्माण केल्याने कमालीचा असंतोष पसरत आहे.
चुनाभट्टीतील धुरामुळे कॉर्बन डॉयऑक्स!ईड, कॉर्बन मोनाकसाईड, सल्फरडॉय, कॅल्शियम डॉय ऑकसाईडचे सूक्ष्म कण असतात. या विषारी धुरामुळे श्वासनाचा विकार, फुफुसांचे नुकसान, डोळे, त्वचा, हृदयविकार सह रक्त वाहिण्यावर ताण येतोय. यासोबत हवेचे प्रदूषण वाढून परिसरातील वनस्पती व शेतीचे प्रचंड नुकसान होते त्यामुळे या जीवघेण्या चुनाभट्टी विरोधात येथील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन पुकारले आहे.
माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, सभापती गौरीशंकर खुराणा, ग्रा. पं. सदस्य अंकुश माफूर यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात तमाम नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.