तहसील प्रशासनाने सोडला मोकळा श्वास.. मारेगावातून चोरलेला ट्रक वर्धा जिल्ह्यातून हस्तगत

 

चौघे गजाआड : एलसीबी पथकाची कारवाई 

मारेगाव : दीपक डोहणे 

मारेगाव तहसील कार्यालय परिसरातून मागील जून महिन्यात वाळू तस्करी करणारा जप्ती ट्रक चोरून नेल्याची घटना घडल्याखेरीज प्रशासनात पुरती खळबळ उडाली. या गंभीर प्रकरणाचा मागोवा घेत पोलीस प्रशासनाने चौफेर पालथे घालत हा बहुचर्चित ट्रक वर्धा जिल्ह्यातून ताब्यात घेतला. यातील मुख्य आरोपी असलेले चार जणांना अटक करण्यात आली असून सोबत स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. या कारवाईने मारेगाव तहसील प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

 

मारेगाव तालुका वाळू तस्करीसाठी प्रशासनाच्या पटलावर असतांना मागील फेब्रुवारी महिण्यामध्ये एम एच 36 – 1675 हा ट्रक वाळू तस्करी करतांना मारेगाव तालुक्यातील महादापेठ येथून जप्त करण्यात आला. सदरील ट्रक तहसील परिसरात उभा असतांना 15 ते 17 जून च्या दरम्यान चोरट्यानीं लक्ष करीत चोरून नेला.

 

या बाबतची महसूल प्रशासनाने पोलिसात तक्रार देत पोलीस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे चौफेर फिरवीत वर्धा जिल्ह्यातील सालोद येथील शेख अफरोज शेख अब्दुल (32), शेख रोशन शेख अब्दुल (35) व पालोटी येथील प्रणय धनराज पोहाणे (24), पवन देवराव किनाके (23) यांना स्विफ्ट कार सह ताब्यात घेतले. पोलिसांनी बाजीराव दाखविताच गुन्ह्यांची कबुली देत चोरलेला ट्रक वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे बंदिस्त करून ठेवला असल्याची माहिती देत एलसीबी ने सदरील ट्रक ताब्यात घेत चार जणांना अटक केली.

 

या कारवाईत ट्रक सह स्विफ्ट कार असा किमान 5.50 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून मारेगाव पोलिसांच्या अधिनस्त करण्यात आला.

 

महसूल प्रशासन झाले सजग 

मारेगावचे तहसीलदार निलावाड यांनी वाळू तस्करी करणाऱ्यांचे कारवाईच्या धडाक्यातून कंबरडे मोडले असतांना किमान डझनभर पेक्षा जास्त वाहणावर जप्तीची कारवाई केली. तहसीलदार यांनी वेगवेगळ्या क्लूप्त्यां करीत पारदर्शक कारवाईने तस्करांची पुरती तारांबळ उडत चांगलीच धडकी भरली. जप्तीचे वाहने तहसील परिसरात उभी असतांना चोरीची घटना खळबळजनक आव्हान ठरली. जप्तीतील सर्व वाहनांची आता हवा सोडून टायर जमिनीवर ठेवल्याने प्रशासन आता सजग होत सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे.परिणामी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत सर्वाधित वाळू तस्कर जप्ती कारवाई तालुक्याच्या पटलावर अधोरेखित झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment