– सिसिटीव्ही फुटेज मध्ये उडी घेतांना झाली कैद
– आईवडिलांच्या मृत्यू नंतर थोरला मुलगा पडला एकाकी
मारेगाव : दीपक डोहणे
शिक्षक पेशातील आईवडील.दहा वर्षा पूर्वी वडिलांचे हृदयविकाराने निधन. मुलगा, मुलगी अन आई. गत मार्च महिन्यात केरकचरा जाळतांना आईचाही मृत्यू.दोघेच बहीण भाऊ. मातृपितृ छाया हरविल्यागत नानाविध प्रश्न मनात घिरट्या घालत असतांना हे एकांतवासाचे प्रश्न मुलीच्या आवाक्याबाहेर गेले. अन तीने टोकाचे पावले उचलत थेट पाटाळा वर्धा नदी वर जात भर दुपारी उडी घेत असल्याचे सिसिटीव्ही फुटेज स्पष्ट झाल्याने अवघी पंचक्रोशी हादरली आहे.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 5, घरकुल कॉलनी येथे वास्तव्यात असलेले अरुण व उषाताई खैरे शिक्षक दाम्पत्य. यांच्या संसारवेलीवर शिक्षित मुलगा अन मुलगी. वडीलअरुण खैरे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. तर जि. प. शाळेच्या शिक्षिका उषाताई खैरे ह्या मागील मार्च मध्ये केरकचरा जाळतांना पन्नास टक्के भाजल्या. दीर्घ उपचारांनंतर त्यांचेही दीड महिन्यानंतर निधन झाले.
दोघेच भाऊ यश अन बहीण माधुरी मातृपितृ विना असतांना 28 वर्षीय माधुरी ही डी. फॉर्म झाली होती.काल शुक्रवारी सकाळी दहा वाजता वणी कॉलेज ला जात असल्याची भावाला सूचना करीत वणीवरून ऑटोरिक्षात बसून वरोरा मार्गे निघाली.दुपारी साडेबारा वाजताचे सुमारास पाटाळा वर्धा नदी जवळ माधुरी हिने थांबा घेतला.काही वेळात माजरी येथील एक दाम्पत्य ‘त्या’ ठिकाणी थांबले असता त्यांना मोबाईल, पर्स व चप्पल आढळून आली. यावेळी माधुरी हिच्या मोबाईलवर फोन आला असतांना घटनास्थळवरील हकीकत नातेवाईकांना विषद केली. अन नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेत सिसिटीव्ही फुटेज तपासा अंती माधुरी ही वर्धा नदीत उडी घेत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, एकांतवासाची संधी साधत अचानक माधुरीने तुडुंब भरलेल्या नदीत का उडी घेतली ? याबाबतचे रहस्य कायम आहे.
भाऊ यश याने वणी पोलीस प्रशासनात फिर्याद दाखल केली आहे. आईवडील नसतांना आता बहिणीच्या टोकाच्या निर्णयाने एकुलता एक मुलगा एकाकी पडला आहे. दरम्यान, माधुरी हिच्या निर्णयाने पंचक्रोशी हादरली आहे.