– मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील प्रफुल्ल भोयर झाला ठाणेदार
मारेगाव : कैलास ठेंगणे
वडिलोपार्जित पाच एकर शेतीवर कुटुंबाची गुजरान. मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही. पोरांना शिकवणे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून आई-वडिलांनी शेतीत अपार मेहनत करत प्रफुल्लला शिकविले आणि त्याचे चीज करीत स्वतः प्रफुल्लीत झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. अन शेतकऱ्याच्या पोरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेली यश पाहून सारा गाव गहिवरला अन तो पंचक्रोशीत कौतुकास पात्र ठरतो आहे. प्रफुल प्रभाकर भोयर असे शेतकरी पुत्राचे नाव आहेत.
तरुण, तडफदार आणि तितकाच सहनशील आणि चिकाटी वृत्तीच्या मुलाची आणि त्याच्या जिद्दी वडिलांची ही कहाणी. मारेगाव तालुक्यातील जमतेम पाचशे लोक वस्तीचे गाव असलेल्या गौराळा येथील प्रभाकर भोयर ह्या शेतकऱ्यांच्या पुत्राने जिद्दीच्या जोरावर उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
वडिलोपार्जित पाच एकर शेतीच्या भरोशावर जिद्दीने मेहनत करून वडील प्रभाकर यांनी त्याचे शिक्षणास गदा येवू दिली नाही. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता प्रफुल ने मामाचे गाव गाठले. तेथील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालयात बारावी पूर्ण करीत बीएससी साठी यवतमाळ गाठले.
त्याच वेळी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत थेट इतर मागासवर्गीय महाराष्ट्रातून सोळावा क्रमांक पटकाविला. शेतकऱ्याच्या घरच्या परिस्थितीचा अनुभव असलेल्या प्रफुल्ल खाजगी शिकवणी पासून मुकला. तरी त्याने यश संपादन करीत प्रशासकीय सेवेच्या मोठ्या हुद्द्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे किंबहुना आपल्या गावचा पोरा ठाणेदार झाल्याचा अभिमान प्रत्येकांच्या डोळ्यात साठवित आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मला खाजगी शिकवण लावता आले नाही मात्र शिकवणी असेल तरच यश मिळते असे नाही तर स्वयंशिस्त आणि अभ्यासाचे नियोजन चांगले असेल तर नक्कीच यश आपल्या भोवती फिरते.
– प्रफुल भोयर
गौराळा ता. मारेगाव
Congrats 🎊