– पुरुषोत्तम कांबळे यांचे मध्यरात्री निधन
– दुपारी तीन वाजता होणार अंत्यसंस्कार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील प्रसिद्ध एम.के.डेकोरेशन चे संचालक मोरेश्वर कांबळे व बिल्डींग कंत्राटदार किशोर कांबळे यांचे वडील पुरुषोत्तम कांबळे यांचे आज सोमवारला मध्यरात्री 3 वाजताचे सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 78 होते.
पुरुषोत्तम कांबळे हे गत वर्षभरापासून आजारी होते.त्यांच्या पायाची शस्रक्रिया झाली होती. काही दिवसापासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड हे सातत्य ठरले होते. अखेर मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालविली.
मृत्यू पश्चात त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंड असा आप्तपरिवार आहे.
आज सोमवार ला दुपारी तीन वाजताचे सुमारास त्यांचेवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.