राजकीय – सामाजिक क्षितिजा पलीकडील बहुआयामी व्यक्तिमत्व राजूभाऊ उंबरकर…!

 

– अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

– शुभेच्छुक – आकाश खामनकर मारेगाव 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

एरवी वणी परिसरात सक्षम नेतृत्वा अभावी येथील जनतेंनी अनेक वर्षांपासून विकासाचा सूर्य कधी बघितलाच नाही. मात्र सत्ता हाती नसतांनाही राजू उंबरकर या धडाडीच्या नेतृत्वाने या परिसरातील जनतेच्या मनात आशेचा एक नवा किरण दाखविला आहे. भावी राजकीय नेतृत्व म्हणून नागरिक एक आशा ठेवून विधानसभेचं नेतृत्व बघत आहे . या उमद्या आणि खमक्या नेतृत्वाचा आज संपूर्ण वणी उपविभागात मोठ्या जल्लोषात वाढदिवस अभिष्ठाचिंतन सोहळा साजरा होतो आहे.

 

काळ्या सोन्याची मुबलक खाण असणाऱ्या वणी विधानसभेत मोठी आर्थिक सुबत्ता यायला हवी होती. मात्र आजवर विविध पक्षाच्या अनेक नेत्यांनी लोकांना गाजराची पुंगी दाखवत मागासलेपणाच्या खाईत ढकलले. यामुळे येथील दलित,गरीब ओबीसी,आदिवासी व अल्पसंख्यांक हे विकासापासून कोसो दूर राहिले. केवळ मते मागून घ्यायची व जनतेच्या छोट्या प्रश्नांना देखील न्याय द्यायचे नाही असे संधी साधू राजकीय पटलावर मागील काही वर्षांपासून राजू उंबरकर नावाचा एक नवा आशेचा किरण उदयास आला आहेत.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या साध्या पदापासून राजूभाऊ थेट मनसेच्या नेते पदापर्यंत पोहचले आहे. या परिसरातील उंबरकर यांचे नेतृत्व गुण ओळखलेले राज ठाकरे हे राजू उंबरकर च्या पाठीवर सदैव कौतुकाची थाप देत आहे.

 

उल्लेखनीय म्हणजे कोणतेही राजकीय पद नसतांना आपल्या समस्या घेवून मोठ्या आशेने लोक राजूभाऊ कडे जातात. ‘आपला हक्काचा’ माणूस म्हणून त्याला समस्या सांगतात व तेवढ्याच तन्मयतेने व आपुलकीने राजू भाऊ त्या प्रश्नांचे निराकरण करतात. गंभीर आजाराचे रुग्ण, अस्मानी सुलतानी संकटाने हादरलेले शेतकरी, शिक्षणात समस्या येणारे विद्यार्थी, बस ची गैरसोय असणारे विद्यार्थी, सरकारी खाबुगिरीत अडकलेले आम्ही नागरिक असे कित्येक जण राजूभाऊ कडे धाव घेतात व त्यांच्यासाठी शासन प्रशासन सोबत अनाहुतपणे लढतो,भांडतो आंदोलने करतो. या उभरत्या व उमद्या नेत्याचा आज वाढदिवस… वाढदिवसानिमित्त त्यांनी राजकीय उत्तुंग भरारी मारून वणी विभागाचे कुशल नेतृत्व करावं ह्याच अपेक्षा व दिलखेचक शुभेच्छा….!

शुभेच्छुक

आकाश खामणकर – मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment