– अवघी नगरी प्रेमात रंगली…..!
मारेगाव : दीपक डोहणे
कोण म्हणते मारेगावात काहीच पिकत नाही. सर्वत्र उदासिनता आहे. सध्या ऐन 42 डिग्री च्या कडक उन्हाळ्यात मारेगाव शहराच्या लगत ओसाड, मुरमाड जागेवर चक्क सरकारी फुग्यांचे जोरदार पीक बहरले आहे. तालुक्यातील युवक – युवतींच्या अथक परिश्रमाने ही किमया घडून आली आहे. हे नयनरम्य नजारा बघण्यासाठी तुम्हाला फक्त शहराचे नवीन नवीन लेआऊट बघावे लागेल. कंडोम चे शेकडो पॉकेट अन् त्यातील सरकारी फुगे तुमचे डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाही.
मारेगाव चे गावापासून शहरात रूपांतर झाले. कॉलेज अन् फास्ट फूड ची दुकाने वाढली. मिशी न फुटलेल्या पोरांच्या कमरेखाली बाईक अन् कानाखाली मोबाईल आले. यातून आता आपली बाली अन् बंड्या काय करामती करतात याची पुसट कल्पना देखील आई – वडिलांना नाही. शहरात देह आकर्षणातून अनेकजण आंबट शौकीन होत आहे. लेआऊट मधील रिकामे कंडोम पॉकेट, सिगरेट, अन् दारूच्या रिकाम्या बॉटलांचा खच अनेकांना धक्का देऊन जात आहे.
ओयो ची धम्माल…!
वणी, वरोरा येथे ओयो हॉटेल सुरू झाल्याने मारेगाव तालुक्यातील अनेक कोवळ्या मुली तोंडाला दुप्पटा बांधून तोंड काळे करून येत आहे. या हॉटेल चे रजिस्टर तपासल्यास अनेक पालकांच्या पायाखालची वाळू घसरल्या शिवाय राहणार नाही. कॉलेजला जाते म्हणून एकच मुलगी एका वेळी अनेकांच्या कलेज्यात शिरत आहे.
गरिबांच्या ऐश्वर्या साठी धामणी रोड जिंदाबाद…
कमी बजेट मध्ये आपली तहान भागविण्यासाठी शहरातील धामणी रोड वरील एका शेतात रूम बांधण्यात आली आहे. शंभरी दिल्यावर खास तास भरासाठी टोटल धमाल ची इथे सोय होऊन जात आहे.अनेक पालकांना आता दक्ष राहून आपल्या मुला मुलींवर गुप्त आणि बारीक नजर ठेवण्याची चिंताजनक वेळ येऊन ठेपली आहे.
एक म्यान मध्ये पाच तलवार….
एकेकाळी कुणाची चीट्ठी सापडली तर संपूर्ण गावभर बोंब व्हायची. परंतु आता स्मार्ट फोन ने आताची पिढी जास्तच स्मार्ट झाली आहे. वॉट्सॲप ने कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने हल्ली एकच मुलगी एकाच वेळी चार ते पाच बॉयफ्रेंड ठेवण्याची फॅशन मोठ्या प्रमाणात पसरली आहे.
एकंदरीत एकेकाळी सभ्य अन् शांत तालुका म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या मारेगावची तरुणाई आता वासनेच्या भयंकर वाटेवर निघाली आहे. हे धक्कादायक चित्र तालुक्यातील नागरिकांसाठी मोठ्या चिंतनाचा विषय ठरत आहे.