आरोप प्रत्यारोपाने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

बदनामी वृत्तप्रकरणी कारवाईसाठी निवेदन

– मानहानीसाठी न्यायालयात जाणार

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

लोकसभेची निवडणूक संपताच मारेगाव तालुका काँग्रेस मध्ये वादळी वारे वाहू लागले. यातून वार्ताहरांना जाहिरातीचे पैसे पुढाऱ्यांनी गडप केल्याचे एका वृत्तपत्रात बदनामीकारक वृत्त प्रकाशित झाले. यामुळे काँग्रेस नेते त्या वृत्ताबद्दल कमालीचे संतापजनक नाराज होवून वार्ताहर विरुद्ध दंड थोपटून उभे झाले आहे. या वार्ताहरला पक्षातीलच एका तथाकथित समाजसेवकाने खतपाणी दिल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.त्यामुळे यत्किंचितही आधार नसतांना बदनामीकारक वृत्त प्रकाशित करणाऱ्या संपादक व वार्ताहर विरुद्ध काँग्रेसचे तीन पदाधिकारी लाखो रु. चा मानहानीचा दावा दाखल करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीला लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रतिभाताई धानोरकर यांना विजयी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या नेत्यांसहीत पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र पक्षांतर्गत प्रचारासाठी पैसे खर्च करण्याचे अधिकार आपल्याकडेच देण्यात आले नाही म्हणून लोकहिताचे सोंग करणाऱ्या एका पुढाऱ्याने कथित वार्ताहराच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्थानिक तीन पक्ष पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बेछूट आरोप करणारे वृत्त काही प्रसारमाध्यमातून जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आले.त्यामुळे तालुका काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या बदनामीकारक वृत्त प्रसार माध्यमावर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहे.

 

खर्चाचे अधिकार आपल्यालाच मिळाले नाही म्हणून एका स्वयंम घोषित उथळ पदाधिकाऱ्याने ही बातमी छापूण घेतली अशीही चर्चा राजकीय गोटात जलदगतीने पसरली आहे. हेतूपूरस्सर बदनामी करणाऱ्या या प्रसार माध्यमात काँग्रेसचे तीनही पदाधिकारी न्यायालयाचे दार ठोठावून लाखो रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे.दरम्यान, या गंभीर आरोपाची काँग्रेसच्या वरिष्ठस्तरातून सखोल चौकशी झाली पण या आरोपात काहीच तथ्य निघाले नसल्याचा निर्वाळा देत पक्षाने पदाधिकाऱ्यांवर निर्दोषाचा शिक्कामोर्तब केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment