– मारेगावातील घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधील इसमाने मंगळवारला रात्री विहिरीत उडी घेत जीवनायात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली.
विजय नामदेव काळे (55) असे विहिरीत उडी घेवून इहलोकाची यात्रा केलेल्या इसमाचे नाव आहे. ते मागील काही दिवसापासून आजाराने त्रस्त होते. आजाराशी दोन हात करतांना मानसिकता विचलित होत त्यांनी मारेगाव शिवारात असलेल्या ठाकूर यांचे शेतातील विहिरीत टोकाचा निर्णय घेतला.
रात्री आठ वाजताचे दरम्यान घडलेली दुर्देवी घटना उजागर होत शव मारेगाव रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले.मृतक विजय काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे.