– सुदैवाने आईवडील बाळ बाहेर निघाले
– खैरगांव फाट्यानजीकची घटना
बोटोणी : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव वरून खंडणी कडे जात असताना मारुती कार ने अचानक पेट गाडीमधील पवन नक्षणे व त्यांची पत्नी व लहान बाळ समयसुचकतेने गाडीबाहेर पडले. सुदैवाने समोरील अनर्थ टळला. अवघ्या वेळात कार ला आगीने कवेत घेत कार क्रमांक एम. एच.34 एफ 3898 जळून खाक झाली.
खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे सह त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाचा बाळ हे तिघे बोटोणी येथून खंडणी कडे निघाले. काही वेळातच खैरगांव फाट्यानजिक कार ने अचानक पेट घेतला. पेट घेताच तिघेही कार बाहेर पडले. काही कळण्यापूर्वी आगीने कार ला पूर्णतः कवेत घेत वाहन जळून खाक झाले.