आत्महत्येची धग… अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावत संपविली जीवनयात्रा

 

  – नवरगाव (धरण )येथील घटना

विटा : न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील नवरगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेत जीवनाचा अखेर केल्याची दुर्देवी घटना आज सोमवार ला दुपारी उघडकीस आली.

 

उमेश अशोक नक्षिणे (35)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन दिवसापासून मानसिक स्थिती विचलित असलेल्या शेतकऱ्याने पशुधनाच्या गोठ्यात गळफास घेतला. काही वेळातच ही बाब कुटुंबाच्या निदर्शनास येताच एकच हंबरडा फोडला.

 

दरम्यान, मृतक शेतकऱ्याच्या शिरावर खासगी कर्ज असल्याचे कळते.मृतकाच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment