– मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपचे आवाहन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
जागतिक महिला दिनानिमित्त
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप तर्फे खास महिला व मुलीं करिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आहे.
यामध्ये विद्यार्थीनी तसेच स्त्रियांसाठी रॅली मध्ये विविध राज्यातील लोकनृत्या सह देखावे सादर करण्यासाठी आपणास विनंती करण्यात येत आहे.
भारतातील कोणत्याही राज्यांपैकी एका राज्याचे नृत्य सादर करावयाचे आहे. या मध्ये कमीत कमी आठ तर त्या पेक्षा कितीही महिला तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ शकतात.
सहभागी प्रत्येक समूह ला आकर्षक स्मृतिचिन्ह व त्या समूहातील प्रत्येक महीलास आकर्षक मेडल व प्रमाणपत्र देण्यात येवून गौरविण्यात येणार आहे.
रॅली दिनांक 9 मार्च 2024ला ठीक संध्याकाळी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहर मार्गक्रमण करीत परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रँलीचे समापन होणार आहे.
आपणास योग्य वाटेल अश्या कोणतेही एकाराज्य लोकनृत्य विषयाला अनुसरून रॅली मध्ये भाग घेता येईल. सादरीकरण करतांना कोणाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुःखवल्या जाणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी 10 मार्च ला रात्री 8 वाजता केवळ महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या संस्थेतून, महविद्यालयातून,शाळेतून जास्तीत जास्त महिलांनी तसेच युवतींनी यात सहभाग घेण्याचे आवाहन मैत्री कट्टा ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.
नृत्य तसेच देखाव्याचे प्रकार,पंजाब /भांगडा,आसाम/बिहु,महाराष्ट्र/कोळी नृत्य/आदिवासी नृत्य/लावणी ह्या प्रकारे राजस्थानी,गुजराती नृत्य,बंगाली नृत्य,छत्तीसगढी नृत्य,बंजारा नृत्य , डंडार ,गरबा चा समावेश असणार आहे.या करिता दीपक जूनेजा, मो.9545110600, सौ.बिनाताई दुपारे हेपट मो.9356035463 सौ.प्रतिभाताई डाखरे मो.992269648 यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.