वेदनादायी… वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

 

पांढरकवडा (पिसगाव )येथील घटना 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील शेती ठेक्याने करणाऱ्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. 6 आँगष्ट रोजी दुपारी दोन वाजताचे सुमारास घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अनिल रमेश फरताडे असे वीज पडून ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

 

अनिल हा मागील अनेक वर्षांपासून भाड्याने शेती करून गुजरान करायचा. दोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेला अनिल कष्ठकरी व कुटुंबातील आधारवड होता.

 

आज बुधवारला नेहमीप्रमाणे पांढरकवडा शिवारातील शेतात कामे करीत असतांना अचानक तूरळक पावसासह विजेचा कडकडाट झाला. यातच अनिल याच्या अंगावर वीज पडून जागीच गतप्राण झाल्याची वेदनादायी घटना घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मृतक अनिलच्या पश्चात आई, पत्नी व एक वर्षाची मुलगी आणि लहान भाऊ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment