मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
करंजी कडून येणाऱ्या ट्रकला आगीने अचानक कवेत घेत ट्रकमधील लाखो रुपयांचे सोयाबीन व ट्रक खाक झाल्याची घटना आज शनिवारला सकाळी 5 वाजता राज्य महामार्गांवर बोटोणी नजिक घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, करंजी कडून सोयाबीन घेवून जाणाऱ्या धावत्या ट्रक क्रं. MH 26 AB 0954 ला आज सकाळी अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. चालक व वाहकाने सतर्कता बाळगत ट्रक थांबवित खाली उतरले.यावेळी दुतर्फा वाहतूक बराच वेळ खोळबंली होती.
सोयाबीन भरलेला ट्रक काही वेळातच आगीत पूर्णपणे खाक झाला. पांढरकवडा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यागत आग नियंत्रणात आली. मात्र घटनेत लाखो रु. चे नुकसान झाले.अपघाग्रस्त ट्रक हा ढाणकी बिटरगाव वरून येत चंद्रपूर कडे जात होता.
अपघात होताच पांढरकवडा व मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली.