– वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल
– शेतकऱ्यात भितीचे सावट
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील गौराळा शिवारात वाघाचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यात कमालीची दहशत पसरली आहे.दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्याने वाघ परिसरात पालथे घालत असल्याची पुष्टी मिळाली.
तालुक्यातील गौराळा येथील शेतकरी अनिल बोन्डे हे शिवारात जात असतांना दूरवर कॅनल पर्यंत वाघाचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरात वाघ असल्याची खातरजमा होत आहे.
दरम्यान, काही गावांना लागून डोंगरगाव जंगलात वाघाचा वावर असल्याचे बोलले जात आहे.काही दिवसापूर्वी निंबाळा परिसरात वाघाने रोहीचा पडशा पाडल्याची चर्चा शेतकऱ्यात आहे.
तूर्तास शेतीचे कामे असल्याने बहुतांश शेतकरी शिवारात असते. यातच वाघाचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यात दहशत आहे.यावर पायबंद म्हणून विभागाने गस्त ठेवावी, मॉनिटरिंग करावे, नेटवर्क वाढवावी व शेतकऱ्यांना भितीतून मुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.