Breaking News

पोळ्याचा बाजार सजला.. सर्जा राजाचा साज महागला..!

 

मारेगावच्या आठवडी बाजारात तुफान गर्दी 

मारेगाव : दीपक डोहणे 

शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण अवघ्या दोन दिवसावर असतांना साज खरेदीची लगबग त्यातच मारेगावच्या आठवडी बाजारात मानवी जत्थ्याने तुफान गर्दीत पोळ्याचा बाजार कमालीचा फुलला मात्र, महागाईचा फटका बसत यंदा बैलाचा साजही महागला.

 

येत्या शुक्रवारी बैल पोळा. या सणाच्या पर्वावर सर्जाराजांच्या सजावटी साठी बैलाच्या साजेची दुकाने मारेगावच्या आठवडी बाजारात बहरली आहे. चौफेर रस्त्यावर ही दुकाने रंगीबेरंगी साजेने खुलून दिसत आहे. त्यातच शेतकऱ्यांसह इतरांच्या गर्दीने आजचा आठवडी बाजार गच्च भरला आहे.

वर्षभर राबराब राबणारा शेतकरी व त्याचा सखा सर्जाराजास सजविण्यासाठी वेसन, पैंजण, झूल, रंग, बेगड, मोरके, बार्शीग, कवडी, घंटा, आंबी हळद, पिंपळपान, सडे, चौरंग आदी साहित्य घेण्यासाठी आजच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांची कमालीची लगबग सुरु होती.

 

एकंदरीत पोळ्याचा सण अवघ्या दोन दिवसावर असतांना यंदा बैलाचा साज महागडा आहे. यात शेतकऱ्यांना कमालीचा आर्थिक फटका बसत आहे. आठवडी बाजारातील हिरव्याकंच भाजी सह पोळ्याचा बाजार सजला आणि फुलला असून आजच्या आठवडी बाजाराने मानवी समुदायाची तुफान गर्दी खेचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment